पाडळीवाडी गावच्या स्थानिक इतिहास पूर्वी आटपाडी तालुक्यातील एका खेड्यात ३५० एकर जमीनीसाठी वाद करून दोन भाऊ येथे आले. त्यातील एक भाऊ पाडळी व दुसरा भाऊ पाडळीवाडी येथे वास्तवास राहिला. त्यावरून गावचे नाव व इतिहास लिहिला गेला.शिराळा शहरापासून ७ कि.मी अंतरावर वसले आहे.या गावामध्ये शिवेवरच सिद्धेश्वर ‘क’ वर्ग तिर्थ क्षेत्र देवालय आहे.गावची कटुंब संख्या ३२० असून लोकसंख्या १४९७ आहे. गावामध्ये १९६६ वर्षी ग्रामपंचायत स्थापना झाली असून त्यामुळे गावातील विविध विकास कामांना चालना मिळत आहे.
ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन
गावामध्ये आर.सी.सी गटर असून त्याची वेळा सफाई केली जाते त्यामुळे डबकी व इतर पाणी साठून राहण्द्याचा प्रश्न उद्भवत नाही.गावामध्ये ५७ LED पोल असल्याने रात्री गाव प्रकाशमय होते. असे आमचे पाडळीवाडी गाव हे टुमदार व सुंदर सोयीनी युक्त असून गावामध्ये सोसायटी इमारत, ‘क’ वर्ग तिर्थ क्षेत्र सिद्धेश्वर ,प्रशस्त व्यायाम शाळा कार्यरत आहे.